- +91 80878 78391
- info@dnyanadapratishthan.org
गुरुकुलची स्थापना 2008 मध्ये श्रीक्षेत्र पैठण येथे झाली आणि ते आधुनिक शिक्षणाच्या पद्धतींना स्वीकारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. गुरुकुल पंचसूत्रावर आधारित कार्य करत आहे: शालेय शिक्षण, अध्यात्मिक शिक्षण, संगीत शिक्षण, सकारात्मक जीवनशैली आणि संस्कार. या पाच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्जवल होते. 2024 या वर्षा मध्ये गुरुकुलमध्ये 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि अनेक विद्यार्थ्यांचे संगोपन गुरुकुलच्या वतीने केले जाते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर कार्यरत असलेल्या गुरुकुलमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देश-विदेशात कार्यरत आहेत. योगी श्री. समाधानीजी गव्हाड हे गुरुकुलचे विद्यार्थी आठ ते दहा देशांमध्ये योगाचा प्रचार प्रसार करत आहेत. शेकडो विद्यार्थी कीर्तनकार, भागवतकार, गायक आणि वादक म्हणून आपली सेवा देत आहे. गुरुकुलच्या शिक्षणातून 500 पेक्षा जास्त विद्यार्थी आज स्वावलंबी झाले आहेत आणि देशहितासाठी कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना चार भाषांमध्ये समाजप्रबोधन व कीर्तन परंपरेचा प्रचार प्रसार करण्याची प्रेरणा दिली जाते
2024 या वर्षांमध्ये 125 विद्यार्थी शिक्षण घेत आहे विद्यार्थी श्रीमद भगवत गीता संपूर्ण पाठ करत आहे 48 विद्यार्थी कीर्तनाच्या सराव परीक्षा देत आहेत प्रत्येक महिन्याला होणाऱ्या परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होत आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था गुरुकुल मध्ये आहे सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय ना नफा ना तोटा तत्वावर गुरुकुलचे व्यवस्थापन चालू आहे. सकाळी सकस नाश्ता, दुपारी सकस भोजन, सायंकाळी भोजन, प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या प्रकारचे नव नवीन पदार्थ विद्यार्थ्यांच्या साठी बनवले जातात. निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थी शिक्षणाबरोबर स्वावलंबी जीवनाचा आनंद घेत आहेत.
गुरुकुल मध्ये 2024 पर्यंत 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण केले आहे. शास्त्री पदवी प्राप्त केलेले वीस ते पंचवीस विद्यार्थी तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करत आहे. समाधान गव्हाड नावाचा साधक विद्यार्थी योगाच्या माध्यमातून आठ ते दहा देशांमध्ये गुरुकुल चे नाव उज्वल केले आहे. शेकडो साधक विद्यार्थी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती आणि भक्ती भाव वृद्धीचे कार्य करत आहे.
शेकडो विद्यार्थी साधक संगीत साधना करून समाजाला एक प्रकारे उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखवत आहे. देश, देव,धर्म, समाजाभिमुख आद्यात्म वृद्धीकरता पर्यत करत आहे याचा सार्थ स्वाभिमान आम्हाला आहे.
व्यसनमुक्त आणि सुसंस्कारित पिढी निर्माण करणे: गुरुकुलचा मुख्य उद्देश व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करणे आहे. विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार, नैतिकता आणि जीवनशैली शिकवून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवले जाते. त्यांना शारीरिक आणि मानसिक ताकद वाढविण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते समाजात एक आदर्श नागरिक म्हणून उभे राहतात.
देशहितासाठी कार्य करणारे सक्षम नागरिक तयार करणे: गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली जाते. त्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक दायित्वांची जाणीव करून दिली जाते, तसेच देशसेवेच्या तत्त्वावर शिकवले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलते आणि ते समाजात सकारात्मक बदल घडविणारे सक्षम नागरिक म्हणून तयार होतात.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, तत्त्वज्ञान, आणि सेवा भाव जागरूक करणे: गुरुकुल विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, तत्त्वज्ञान आणि सेवा भाव याचे महत्त्व शिकवते. त्यांना केवळ शालेय ज्ञान देण्यावर भर न देता, त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना जीवनातील खरे तत्त्वज्ञान आध्यात्मिक शिक्षणाच्या माध्यमातून दिले जाते, जे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन ठरते.परोपकार आणि सेवा भाव जागृत केली जाते, ज्यामुळे ते समाजात एक सकारात्मक बदल घडविण्यास सक्षम होतात.
समाजामध्ये अत्यंत गरीब किंवा अनाथ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे शिक्षणापासून ते वंचित राहता कामा नये प्रत्येकाला आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण मिळाले पाहिजे हा उद्देश मनामध्ये घेऊन गुरुकुल 2008 पासून कार्यरत आहे.
Don’t miss our future updates! Get Subscribed Today!
©2026. Shriram Dnyanada Warkari Ashram. All Rights Reserved.